loading

मातृत्व” म्हणजेच स्त्रीचा दुसरा जन्म : देशपांडे हॉस्पिटल

“मातृत्व” म्हणजेच स्त्रीचा दुसरा जन्म. भारतामध्ये दरवर्षी 11 एप्रिल रोजी माता आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशातील माता मृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस पाळला जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशपांडे हॉस्पिटल जिथे “सुरक्षित मातृत्व” ही प्रमुख जबाबदारी समजली जात असून तशीच ती पार पाडण्यात येते. 10 एप्रिल 2023 रोजी देशपांडे हॉस्पिटल येथे जन्माला आलेले कन्यारत्न हे ह्या गोष्टीची खात्री पटवून देते.

हृदयाच्या झडपांचा आजार असलेल्या आईने यशस्वीरित्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. हे शक्य झाले केवळ डॉक्टर अपूर्वा देशपांडे (प्रसूतीतज्ञ व स्त्रीरोगतज्ञ), हृदयरोग तज्ञ, चिकित्सक आणि कुशल सपोर्ट स्टाफ यांनी घेतलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे. सीझर (C-section) करून बाळाला सुरक्षितरीत्या गर्भाशयातुन बाहेर काढण्यात यांचा मोलाचा सहभाग आहे. आज बाळ व तिची आई दोघीही सुखरूप आहेत.
माता आणि बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य खरोखरच मौल्यवान आहे. जे कोणत्याही प्रशंसा किंवा पुरस्कारापेक्षा अधिक सुखदायक ठरते. सर्वोत्कृष्ट आपत्कालीन काळजी प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्हाला अभिमान वाटतो.

आमच्याशी संपर्क साधा –

देशपांडे हॉस्पिटल, बारामती
-४० वर्षांचा क्लिनिकल अनुभव
-चोवीस तास आपत्कालीन आणि हृदयविकाराच्या सेवा
-उच्च जोखमीच्या गर्भधारणेसाठी आयसीयू, रुग्णवाहिका आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर.

Write a Reply or Comment

Your email address will not be published. Required fields are marked *