loading
'या' कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

भारतात हार्ट अटॅक च्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच हार्ट अटॅक च्या अशा तीन घटना समोर आलेल्या आहेत ज्या अतिशय धक्कादायक आहेत. गुजरातमध्ये वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयरोगतज्ज्ञाचे निधन झाले. त्याच वेळी नोएडामध्ये बॅडमिंटन खेळत असतांना 52 वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला. याशिवाय ब्रेकिंग बॅड स्टार माईक बातेह यांचा देखील हार्ट अटॅक च्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही तिन्ही प्रकरणे अतिशय धक्कादायक आहेत. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांचे अहवाल आलेले नाहीत. सध्याच्या काळात तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा झटका येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजच्या ‘या’ कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका या blog च्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की, तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका नेमक्या कोणत्या कारणांमुळे वाढत आहे?

‘या’ कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

       तरुणांमध्ये वाढत्या हार्ट अटॅक च्या धोक्याची काही सामान्य कारणे आम्ही तुम्हाला खालील प्रमाणे सांगत आहोत. ज्यांच्यामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका वाढत आहे.

  • सतत बसून काम करणे

         हल्ली Work From Home चालू झाल्यामुळे हल्लीचे तरुण घरातून बराच वेळ काम करीत असतात आणि सतत अनेक तास शरीराची हालचाल न झाल्यामुळे हार्ट अटॅक चा धोका वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने अलीकडेच शारीरिक हालचालींसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. अनेक अभ्यास आणि आरोग्य तज्ञ लोकांना दैनंदिन शारीरिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त ठेवण्याची शिफारस करतात. त्याच वेळी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला देखील दिला जातो जो चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

  • मधुमेह हे देखील तरुणांमध्ये हार्ट अटॅक चे कारण बनू शकते.

           काही अभ्यासात असे आढळून आले आहे की आजकाल मधुमेहाची समस्या वाढत आहे आणि ही समस्या तरुणांमध्ये देखील दिसून येत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की सध्या भारतात 100 दशलक्षाहून अधिक भारतीय मधुमेही आहेत आणि 135 दशलक्षाहून अधिक प्री-डायबेटिक आहेत. जेव्हा आपल्याला या चयापचय रोगाची जागतिक स्थिती माहित आहे तेव्हा ही परिस्थिती आणखी भयावह आहे. शरीरातील अतिरिक्त रक्तातील साखर रक्तवाहिन्यांना नुकसान करते आणि नसा आणि स्नायूंच्या सामान्य कार्यावर परिणाम करते ज्यामुळे तरुणांच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. यामुळे देखील तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका वाढत चाललेला आहे.

  • चुकीच्या पद्धतीने जिम करणे हे देखील हार्ट अटॅक साठी कारणीभूत ठरू शकते.

             शरीर निरोगी ठेवण्यासाठी वर्कआउट करायची नक्कीच खूप आवश्यकता आहे परंतु चुकीच्या पद्धतीने जिम ची सवय लावली तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असते. आता आपण उदाहरणार्थ पाहिलं तर वर्कआउट सुरू करण्यापूर्वी वॉर्म अप न करणे आणि व्यायामानंतर थंड न होणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तुम्ही अशा अनेक केसेस पाहिल्या असतील ज्यात त्या व्यक्तीच्या जिमच्या चुकीच्या सवयीमुळे हार्ट अटॅक चा झटका आला असेल. म्हणून जिम सुरू करण्यापूर्वी कमीतकमी 30 मिनिटे स्वतःला वॉर्म अप करून उबदार करण्याचा प्रयत्न करा आणि जिम केल्यानंतर स्वतःला थंड करायचा सुद्धा प्रयत्न करा कारण चुकीच्या पद्धतीने जिम केल्यामुळे देखील तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका वाढण्याची दाट शक्यता असते.

  • लठ्ठपणामुळे देखील तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा झटका वाढू शकतो.

              US-CDC म्हणजेच Centre For Disease And Prevention ने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार हृदयविकार कोणत्याही वयात होऊ शकतो. या अहवालानुसार 35 ते 64 वयोगटातील लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत त्यांना हार्ट अटॅक चा धोका जास्त असतो. आपल्या शरीराचे वजन हे हार्ट अटॅक चे मुख्य कारण असू शकते. प्रामुख्याने कंबरेचा घेर आणि पोटातील चरबीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत जर तुम्हाला हार्ट अटॅक पासून सुरक्षित राहायचे असेल तर तुमच्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे कारण हे देखील तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा झटका वाढण्याचा कारण बनू शकते.

  • उच्च रक्तदाब समस्येमुळे देखील तरुणांमधील हार्ट अटॅक चा धोका वाढत असतो.

           उच्च रक्तदाब हे तरुणांमध्ये हार्ट अटॅक  वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. हार्ट अटॅकप्रमाणेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये देखील तरुणांची सातत्याने वाढ होत आहे. आपल्यापैकी बरेच जण यापासून अंजान राहतात. म्हणजे आपल्यातील कित्येकांना हे माहितीच नाही की आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल त्यामुळे तुम्ही तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासत राहावे जेणेकरून तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी करता येईल. कारण उच्च रक्तदाबाची समस्या असल्यामुळे तरुणांमध्ये हल्ली हार्ट अटॅक चा धोका फार वाढत आहे.

  • धूम्रपान केल्यामुळे देखील तरुणांमधील हार्ट अटॅक चा धोका वाढत असतो.

            हल्ली तरुणांमध्ये धूम्रपान करणे फार सामान्य झालेले आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का? धूम्रपान केल्यामुळे तरुणांमध्ये फक्त कर्क रोगाचाच धोका वाढत नाही तर हार्ट अटॅक चा देखील धोका हल्ली मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. कारण धूम्रपान केल्यामुळे तो तुमच्या ब्लड वेसल्स ला नुकसान पोहोचवत असतो त्यामुळे तरुणांनी धूम्रपान करणे शक्यतो टाळावे ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक चा धोका वाढणार नाही.

  • मद्यपान केल्यामुळे देखील तरुणांमधील हार्ट अटॅक चा धोका वाढत असतो.

            धूम्रपान सोबतच हल्ली तरुणांमध्ये मद्यपान करायचे प्रमाण देखील वाढत आहे आणि यामुळे देखील केवळ लिव्हर कूचकामी होती नाही तर यामुळे तुमच्या हृदयाची गती वाढत असते ज्यामुळे हृदयावर प्रेशर पडते आणि हेच कारण आहे की, मद्यपान केल्यामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका वाढत आहे. त्यामुळे मद्यपान करणे देखील तरुणांनी टाळावे जेणे करून त्यांना हार्ट अटॅक चा धोका वाढणार नाही.

  • Depression मुळे देखील तरुणांमधील हार्ट अटॅक चा धोका वाढत असतो.

             हल्ली तरुणांमध्ये Depression चे प्रमाण देखील प्रचलित झालेले आहे. परंतु या Depression मुळे देखील तरुणांच्या हृदयावर प्रेशर पडत असतो ज्यामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका वाढत जात आहे.

  • झोपेच्या कमतरतेमुळे देखील तरुणांमधील हार्ट अटॅक चा धोका वाढत असतो.

             आजकालची तरुण पिढी अर्धरात्री पर्यंत मोबाईल वापरायची सवय झालेली आहे ज्यामुळे फक्त डोळ्यांनाच त्रास होत नाही तर त्यांची यामुळे झोप देखील पूर्ण होत नाही. आणि त्यामुळेच आजकालच्या तरुणांमध्ये हार्ट अटॅक चा धोका वाढत जात आहे.

Conclusion 

          तर मित्रांनो आम्ही तुम्हाला ‘या’ कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका या blog च्या माध्यमांतून तरुणांना हार्ट अटॅक चा धोका कोण कोट्या करणांमुळे वाढत चाललेला आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला देखील जर हार्ट अटॅक संबंधित काही लक्षणे असते तर त्वरित डॉ. आशोक देशपांडे (Heart specialist in Baramati) ह्यांच्यासोबत Shantabai Deshpande Memorial Hospital या अस्पतालात संपर्क साधावा, ज्यातून तुम्हाला आवश्यक सल्ला मिळेल आणि तुमच्या हृदयाची काळजी घेण्याच्या सुविधा उपलब्ध आहे. संपर्क साधा आणि धोका अधिक वाढण्यापूर्वी उपचार करून घ्या ही नम्र विनंती.

 

Write a Reply or Comment

Your email address will not be published. Required fields are marked *